कोल्हापूरमध्ये प्रथमच फिट्स (अपस्मार)वर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद मोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी बंगलोरचे अँस्ट्र सीएमआय हॉस्पिटलचे प्रसिद्ध मेंदू शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. रवी वर्मा, अस्टर आधार हॉस्पिटलचे मेंदू शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. मन्सुरअली खान उपस्थित होते.
मोटे म्हणाले, अपस्मार हा मानसिक किंवा दैवी प्रकोप नसून, तो एक मेंदूचा आजार आहे. तो संसर्गजन्य नाही. अँस्टर आधारमध्ये यावर शस्रक्रिया उपलब्ध केली आहे.
डॉ. स्वी वर्मा म्हणाले, काही निवडक रुग्णांना अपस्मार शस्त्रक्रिया करून बरे केले जाऊ शकते. औषधानेदेखील फ़िट्सवर नियंत्रण येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा उपाय महत्त्वाचा ठरतो.
डॉ. मन्सुरुअली खान म्हणाले, अस्टर आधारमध्ये आमच्याकडे मेंदू व मणक्याच्या समस्यांकडे सर्व दृष्टिकोनातून पाहण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम आहे. त्यामुळे रुग्णास वेळेवर योग्य उपचार मिळू शकतात. याप्रसंगी डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ. अमित माने, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर