डॉ विजयसिंह पाटील यांनी केली पश्चिम महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक हृदय शस्त्रक्रिया. अँस्टर आधार हॉस्पिटलमध्ये ऐंशी वर्षीय वृद्ध हृदयविकारावरील उपचारासाठी दाखल झाला. उपचारादरम्यान त्याच्या हृदयात कॅल्शियमचे खडे झाल्याचे निदर्शनास आले. त्यच्यावर बायपास शख्क्रियेचा पर्याय होता, मात्र रक्तदाब आणि मुमेहामुळे हा पर्याय धोक्याचा होता. त्यामुळे 'शॉक व्हेव्ह इंटरव्हॅस्कुलर बलुन लिथोट्रिप्सी'चा पर्याय निवडला गेला. गुंतागुंतीची ही शखक्रीया पश्चिम महाराष्ट्रात अँस्टर आधार हॉस्पिटलमध्ये प्रवमच यशस्वी झाली.
शत्नक्रियेविषयी माहिती देताना, डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्टच्या उपलब्धतेमुळे गुंतागुंतीच्या हृदयरोग शस्त्रक्रिया कोल्हापुरात यशस्वी होत आहेत. आयुष्यमान वाढल्याने कॅल्सिफाईड करोनरी आर्टरी डिसीजचे रुग्ण वाढत आहेत. उच्च रक्तदाब, अनियमित कोलेस्ट्रॉल, स्पर्धात्मक जीवन, धुम्रपान, अनियमित जेवण अन् व्यायामाच्या अभावामुळे रक््तवाहिन्यांमध्ये प्लाक (फॅट) जमा होते. ते मोठ्या प्रमाणात साचून राहिल्याने रक्तवाहिन्या बारीक होतात. अशा रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियममुळे धमन्यांच्या आकार घटल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो.
लिथो्ट्रपसी करताना अँजिओण्लास्टीद्वारे जांधेतील रक््तवाहिनीतून कॅथेटर दृदयापर्यंत नेला जातो, फॅटयुक्त बारिक झालेल्या धमनीच्या ठिकाणी बलून कॅथेटरद्वारे सोडला जातो. त्यामुळे धमनीचा आकार मोठा होऊन रक्तपुरवठा नियमित होतो. तेथे पुन्हा फॅट साचू नये म्हणून स्टेंट वापरला जातो. कॅल्सिफाईड करोनरी आर्टरीमध्ये घट्ट फॅट रेग्युलर कॅथेटर धमन्यांपर्यंत नेण्यास अडथळा करतो. कॅथेटर योग्य ठिकाणी पोहोचला तरी बलून, स्टेंट तेथे नेणे अवघड असते. जरी पोहोचले तरी फॅटचे खडे फोडल्यानंतर अँजिओप्लास्टी शक्य होते.
अँस्टर आधारमधील वृद्धावर उपचार करताना उपलब्ध पर्यायांपैकी कटिंग बलून हा होता. यामध्ये धारदार ब्लेड असलेल्या बलूनद्वारे फॅट कापले जाते. उच्चतम तीव्रतेचे बलून वापरून कॅल्शिअमचे खडे
फोडले जातात. त्यासाठी रोटाब्लेटर वापरले जाते, परंतु यामध्ये साईड. इफेक्टचा धोका होता. त्यामुळे या रुग्णावर 'शॉक व्हेव्ह इंट्रव्हेस्कुलर बलुन लिथोट्रिप्सी' वापरली गेली. या तंत्रात बलुनमधील एमीटरदवारे 'अल्ट्रा हायप्रेशर सोनिक व्हेव्हस' फॅटच्या खड्यांपर्यंत पोहोचतात. याद्वारे खडे फुटल्यानंतर धमन्या मोठ्या होतात. या वृद्धाच्या कॅल्सिफाईड करोनरी आररीमध्ये | बायपास शस्त्रक्रिया सुचवली पण वय, मधुमेह, उच्च रक््तदाबांमुळे ती अवघड होती. त्यामुळे 'अस्टर' मध्ये त्याच्यावर 'शॉक व्हेव्ह इंट्रव्हॅस्कुलर बलुनलिथोट्रिप्सी' शखक्रिया यशस्वी करण्यात आली.
प्रतिनिधी कोल्हापूर